अण्णा नवथर । अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व त्यांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. आर्थिक व्यवहारासह कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, सभांचे निमंत्रण, यासारख्या महत्वाच्या जबाबदाºया कुटुंंबातील तरुण मंडळींच्या खांद्यावर आहे. प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांसाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागत असल्याने उमेदवाराला एकट्याला ते करणे शक्य नाही. कुटुंबातील अन्य सदस्यही त्यांच्या मदतीला आहेत. अकोल्याचे भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांच्यासाठी वडील माजीमंत्री मधुकरराव पिचड, आई हेमलता या मतदारांशी संपर्क करत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ किरण लहामटे यांच्यासाठी वडील यमाजी आणि पत्नी पुष्पा हे प्रचारात उतरले आहेत. संगमनेरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी पत्नी कांचन, मुलगा ऋषिकेश, मुलगी डॉ़ जयश्री, बंधू इंद्रजित, बहीण नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुलगी शरयू देशमुख, जावई रणजितसिंह देशमुख हे निवडणूक प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्यासाठी बंधू अनिल, मुलगा अमित आणि पुतण्या आदित्य हे महत्वाची भूमिका बजावत आहेत. शिर्डीत गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे व मुलगा खासदार डॉ़ सुजय विखे हे मतदारांशी संपर्क करत आहेत.काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांच्यासाठी पत्नी मिनाक्षी या मतदारांशी संपर्क करत आहेत. राहुरीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्यासाठी पत्नी अलका, मुलगा अक्षय आणि पुतण्या संदीप यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आई उषा, वडील माजी खा. तनपुरे, चुलते अरुण हे प्रचार करत आहेत. कोपरगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी पती बिपीन, सासरे माजीमंत्री शंकरराव, भाया नितीन, भाया मिलिंद, मुलगा विवेक, इशान, पुतण्या अमित, सुमित, स्नुषा मनाली, रेणुका, निकिता,जाऊबाई कलावती या मतदारांशी संपर्क साधत आहेत. आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्यासाठी वडील माजी आमदार अशोक काळे, आई पुष्पा, पत्नी चैताली, आत्या स्नेहल शिंदे, चुलते संभाजी, हे मतदारांशी संपर्क करत आहेत. अपक्ष राजेश परजणे यांच्यासाठी बंधू कृष्णा, पुतण्या विवेक, त्यांच्या पत्नी वैशाली, भगिनी मंदाबाई ढसाळ, पदमा दिवटे, मुलगी गायत्री आणि पूजा आदी सक्रिय आहेत. नेवाशात क्रांतिकारीचे शंकरराव गडाख यांच्यासाठी वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव, आई शारदाताई, बंधू प्रशांत, विजय, पत्नी सुनीता, चुलत बंधू सुनील, प्रवीण, चुलते विश्वास, मुलगा उदयन हे प्रचारात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा आणि मुलगा विष्णू हे मतदारांशी संपर्क साधत आहेत.शेवगावमध्ये भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यासाठी भाया राहुल, जाऊबाई मोनाली हे प्रचारात सक्रिय आहे. मोनिका राजळे यांचे चिरंजीव कृष्णा हे आॅस्ट्रेलियातून प्रचारासाठी आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासाठी वडील बबनराव, पत्नी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती, मुलगा ऋषिकेश, पुतण्या अनिल यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे. श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासाठी बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाशिव,पत्नी प्रतिभा, मुलगा विक्रमसिंह हे प्रचार करताना दिसतात. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्यासाठी भाऊ बाळासाहेब, पत्नी मनिषा, मुलगा प्रशांत, प्रवीण प्रचार करत आहेत. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यासाठी पत्नी माजी पंचायत समिती सभापती आशा या मतदारांशी संपर्क साधत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी आई सुनंदा, वडील राजेंद्र, सासरे सतीश मगर हे प्रचारात सक्रिय आहेत. तसेच आजोबा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित यांच्यासाठी सभा घेतल्या आहेत. पारनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय औटींच्या पत्नी जयश्री औटी, मुलगा अनिकेत, स्नुषा तृप्ती हे प्रचार करताना दिसतात. आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या प्रचारात सक्रिय आहेत.नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी वडील आमदार अरुण जगताप, आई पार्वती, पत्नी शीतल, बंधू सचिन, भावजयी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप या मतदारांशी संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी पत्नी शशिकला, मुलगा विक्रम हे प्रचार करताना दिसतात.काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांच्या पत्नी कविता, मुलगी डॉ. मितवा, बहीण गायत्री गुजरे तसेच त्यांचे बंधू अंकुश व पुतणे असे अख्खे कुटुंबच मोर्चा सांभाळत आहेत. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्याकरीता पत्नी माजी नगराध्यक्षा मंदाताई या प्रचारात सक्रीय आहेत.शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यासाठी गत निवडणुकीत वडील माजीमंत्री अशोक पाटील डोणगावकर आणि सासरे आप्पासाहेब राजळे यांची खंबीर साथ मिळत होती.यावेळी हे दोघेही आजारी असल्याने राजळे यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ़ सुजय विखे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ताकद उभी केली आहे.
उमेदवारांचे कुटुंब रंगले निवडणूक प्रचारात; नातेवाईकांच्या पायाला भिंगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:14 PM