लोणी (जि. अहमदनगर) - घटस्फोटित मुलीशी लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाला वाघवाले समाजाच्या जातपंचायतीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार प्रवरानगर परिसरात उघडकीस आला आहे.शुक्रवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. अजून कुणालाही अटक झालेली नाही. ‘तीस’ नावांचा दंड भरून ज्या जातपंचायतीने तलाक दिला त्याच जातपंचायतीने दुसरे लग्न केले म्हणून समाजातून वाळीत टाकल्याची फिर्याद आयेशा अली शेख (रा. बाभळेश्वर) हिने दिली आहे. त्यावरून बाबन रहेमान पठान, हबीब दगडू पठाण, बक्षण गुलाब पठाण, (रा. प्रवरानगर), सैय्या हसन शेख (रा. प्रवरानगर), उस्मान हज्जुभाई पठाण, इमाम धोंडी शेख (रा. लोहगांव), गफूर बालम पठाण (रा. बाभळेश्वर) या वाघवाले समाजातील जातपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी प्रवरानगर येथे बक्षण गुलाब पठाण यांच्या घरासमोर जातपंचायत भरविली.माझे सासू-सासरे यांना बोलावून तुम्ही ‘तीस’चा दंड भरा, नाही तर तुम्हाला वाळीत टाकले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार नाईलाजास्तव माझ्या सासू सासºयाने दीड लाख रूपयांचा दंड जातपंचायतीस दिला.
घटस्फोटित मुलीशी लग्न केल्याने कुटुंब वाळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 3:44 AM