शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

ब्राह्मणीत सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू,पाच दिवसात तपासणी करून अहवाल तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 6:19 PM

ब्राह्मणी- सारीच्या पार्श्वभूमीवर  कुटुंब निहाय सर्व्हे सुरू ब्राह्मणी- कोरोना पाठोपाठ धुमाकूळ घालणाऱ्या सारी रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ब्राह्मणीत दोन दिवसांपासून कुटुंबनिहाय सर्व्हे सुरू आहे. अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना प्रभागनिहाय सर्व्हेसाठी कुटूंबाची जबाबादरी देण्यात आली आहे.

ब्राह्मणीत सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू,पाच दिवसात तपासणी करून अहवाल तयार करणार

ब्राह्मणी- सारीच्या पार्श्वभूमीवर  कुटुंब निहाय सर्व्हे सुरू ब्राह्मणी- कोरोना पाठोपाठ धुमाकूळ घालणाऱ्या सारी रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ब्राह्मणीत दोन दिवसांपासून कुटुंबनिहाय सर्व्हे सुरू आहे. अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना प्रभागनिहाय सर्व्हेसाठी कुटूंबाची जबाबादरी देण्यात आली आहे.

राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविद खामकर यांच्या आदेशानुसार पाच दिवसात सर्व्हे पूर्ण करून संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे. कुटूंबातील सदस्यांची माहिती घेवून ताप, सर्दी,खोकला व श्वसनाचा त्रास याबाबत माहिती घेतली जात आहे.बुधवार पासून कुटुंब निहाय सर्व्हे सुरू करण्यात आला असून यामध्ये ८८८ कुटूंबातील एकूण ४ हजार ३६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.१७ जेष्ठ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून आली. सबधितांवर खाजगी व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहे. कोरोनाच्या धर्तीवर सारीपासून बचावासाठी ब्राह्मणीत सदर सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य सेविका सविता चव्हाण यांनी दिली.सरपंच प्रकाश बानकर,ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका व अंगणवाडी सेविका सध्या युद्धपातळीवर कुटुंब निहाय सर्व्हे करत आहे. ब्राह्मणीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आज अखेर बाहेरून आलेल्या  २६० व्यक्तींना होम क्वारंनटाईन करण्यात आले.दिवसागणिक ब्राह्मणीत येणाऱ्या बाहेरील व्यक्ती गावात येवून वास्तव्य करत आहे.त्यामुळे ब्राह्मणी गावासाठी चिंतेची बाब ठरत आहे.कोरोना विरोधातील युद्धात सुरवातीपासून योग्य नियोजन केल्यामुळे अन्य गावांच्या तुलनेत लॉकडाऊन यशस्वी होत आहे.गावातील अवैध व्यवसाय थांबविण्यात कोरोना दक्षता समितीस यश आले आहे.आता आगामी काही दिवस ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आहवान ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समितीकडून करण्यात येत आहे..