शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:23 PM

तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन व व्यवस्थापनासाठी २४ तास तत्पर असलेले तहसीलदार नामदेव पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापनाचा नवा आदर्श उभा केला आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेले तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पडालसे. पाथर्डी तहसीलचा कारभार सांभाळल्यापासून तहसीलमध्ये येणाºया प्रत्येक तक्रारदाराचे थेट म्हणणे ऐकून तात्काळ तोडगा काढण्याचा पायंडा पाटलांनी पाडला. गेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना खरीपाचे ४२ कोटीचे अनुदान विनातक्रार वाटप केले. तसेच तांत्रिक अडचणीत अडकलेल्या व ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या अनुदानपात्र शेतकºयांसाठी अतिरिक्त १४ कोटींची मागणी शासनाकडे करून काही अनुदान वाटपाला सुरवात केली आहे.तालुका माझे कुटुंब आहे, असे समजून विविध संकटे, नैसर्गिक आपत्ती ही लढण्याची संधी देत असतात, असा विश्वास बाळगून गत दुष्काळात शेतकºयांसाठी थेट उपाययोजना व व्यवस्थापणावर भर दिला. तालुक्यात १०८ छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे तसेच १०३ गावासाठी अमरापूर येथून २४ टॅँकर, राक्षी येथून ९१ टॅँकर, पांढरीपूल येथे ४२ असे एकूण १५७ टॅँकरच्या माध्यमातून ३९१ खेपांचा ताळमेळ घालून पारदर्शी नियोजन केले. तालुक्यातील विद्युत पुरवठा, भारनियमन, महामार्ग अपघात, दहावी-बारावी कॉपी थांबवण्यासाठी, शिव रस्ते खुले करण्यासाठी शिवार भेटी घेवून सामोपचाराने जागेवरच वाद मिटवण्यास प्राधान्य देताना जनसामान्याच्या मनात पाटलांनी आपुलकी निर्माण केली.व्यवस्थापनात गडबड झाली तर तात्काळ उपाययोजना करून येणारे मोर्चे, आंदोलकांना शांततेने तोडगा काढून हसतमुखाने माघारी पाठवले जात असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.तालुक्यातील शासनाच्या सर्व कार्यालयाशी व्यवस्थित ताळमेळ घालून कामकाज करत तलाठी, पशुधन अधिकारी यांच्याकडून दैनदिन अहवाल मागवून जनावरांच्या छावण्यांचेही त्यांनी योग्य नियोजन केले आहे.परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रबोधनदहावी बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनाचा नवीन प्रयोग तहसीलदारांनी तालुक्यात सुरू केला. त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले. जनावरांच्या छावणीमधील तक्रार प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही केली. ताळमेळ घालण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला. पाणी चोरी रोखण्यासाठी उद्भव ते वितरणाचे ठिकाण येथे तपासणी करण्यासाठी प्रतिनिधी नेमले. फुंदेटाकळी येथील पाणी चोरीबाबत तात्काळ गुन्हा नोंदवला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी