शिर्डी : रोजगारासाठी जिल्ह्यात विसावलेल्या राहाता, संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील १५१९ मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरची वाट धरली. या मजुरांना घेवून साईनगरीतून चौथी रेल्वे शुक्रवारी दुपारी उत्तरप्रदेशला रवाना झाली. या मजुरांचा घरी परतण्याचा खर्च राज्य सरकारने केला आहे. यासाठी ९ लाख ४७ हजार ७०० रुपये खर्च आला आहे. भविष्याबाबत अनिश्चीतता असली तरी घराच्या ओढीने व त्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाने घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल या मजुरांनी शिर्डी सोडण्यापूर्वी ऋतज्ञता व्यक्त केली. साईनगरीतून उत्तरप्रदेशला जाणारी ही चौथी रेल्वे आहे. आतापर्यंत ५७३१ मजुरांना उत्तरप्रदेशात स्वगृही पाठविण्यात आले आहे. तालुका पातळीवरून एवढ्या संख्येने मजूर स्वराज्यात पाठवणारा राहाता एकमेव तालुका आहे. रेल्वे चालक व गार्डचा यावेळी तहसीलदार हिरे यांनी सत्कार केला.आपल्या श्रमातून येथील विकासात हातभार लावणाºया या मजुरांना रेल्वे स्थानकावर प्रशासनाने निरोप दिला. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, संगमनेर तहसिलदार अमोल निकम, कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे, कोपरगावचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसिलदार सचिन म्हस्के, देसले, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना उपस्थीत होते. मजुरांना स्वगृही पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. संस्थानने दिली अन्नाची पाकिटेमजुरांना संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रसादालय कर्मचा-यांमार्फत अन्नाची पाकीटे दिली. परिवहन महामंडळाने या कामगारांची संगमनेर व कोपरगाववरून शिर्डीला आणण्यासाठी मोफत व्यवस्था केली. रेल्वेत १५१९ मजुरांचा समावेश होता. या मजुरांना उत्तरप्रदेशातील उन्नाव, सीतापुर व बस्ती येथे सोडण्यात येईल.
उत्तरप्रदेशातील १५१९ मजुरांना निरोप; साईनगरीतून चौथी रेल्वे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 3:33 PM