शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 7:00 PM

कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

देवदैठण(जि.अहमदनगर) : कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.आबासाहेब निंभोरे असे मृत शेतक-याचे नाव आहे. याबाबत मयत निंभोरे यांचे मेहुणे लीलाधर ओहोळ यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, की मयत निंभोरे यांनी शिरूर (जि. पुणे) येथील कार्पोरेशन बँकेचे कर्ज घेतले होते. या कर्जाची ते परतफेड करू शकत नव्हते. याच विवंचनेत ते सतत होते. शुकवारी पहाटे त्यांची आई लहानुबाई निंभोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. तेव्हा शेतकरी निंभोरे यांनी शेजारील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे रावसाहेब शिंदे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाfarmer suicideशेतकरी आत्महत्या