पाथर्डी : तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी दुपारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. सोनोशी गावात संभाजी काकडे हे पत्नी व दोन मुलांसह रहात होते. मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन वर्षापासून असलेल्या दुष्काळामुळे शेतात फारसे काही हाती आले नाही. त्यातच वाढता खर्चामुळे ते नाराज असायचे. मागील वर्षी शेतात जेवढे खर्च केले तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. त्यातच मुलांचे शिक्षण तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. सततच्या नापिकीला कंटाळून काकडे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितले. पोलिसांनी काकडे यांच्या नातेवाईकांच्या खबरीवरून आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
दुष्काळ, नापिकीमुळे शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 7:07 PM