शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:50 AM

पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.

सुदाम देशमुख अहमदनगर : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे वापरतात. मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ममताबाई भांगरे या बुजगावण्याशिवाय शेती करा असा धडा जगाला देत आहेत. पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.देवगाव (ता. अकोले) येथील ममताबाई या हजारांच्यावर चिमण्या-पाखरांच्या अन्नदाता बनल्या आहेत. त्या म्हणतात, शेतकऱ्यांनी पाखरांना दाणापाणी भरविण्याची खबरदारी घ्यायला हवी. मात्र, शेतकरीच आज पाखरांना दूर लोटू पाहत आहेत. जे अयोग्य आहे.माझ्या अंगणात असलेल्या बोगणवेलावर दररोज शेकडो चिमण्या बागडतात. दिवसातून तीन वेळामी त्यांना तांदूळ टाकते. त्यामुळेमी अंगणात गेले तरी चिमण्या चिवचिवाट करुन माझ्यावरील प्रेम व्यक्त करतात. वर्षात तांदळाचे एक पोते मी या चिमण्यांनाच खाऊ घालते.आपल्या शेतातही पाखरांना मुक्त प्रवेश आहे. पाखरे हाकलण्यासाठी मी शेतात कधीही बुजगावणे उभे करत नाही. त्यामुळे पाखरे मनसोक्तपणे पिकांशी खेळतात. याचा फायदा असा होतो की पिकांवर असलेले किटकही पाखरे खाऊन टाकतात.तेच खरे पिकांचे राखण करतात. त्यामुळे माझ्या शेतात पिकांवर रोग येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रासायनिक फवारण्या करण्याचीगरज पडत नाही.पाखरांनी काही अन्न खाल्ले तरी आपणाला चांगले उत्पादन मिळते. पाखरांचा किलबिलाट हे एकप्रकारचे संगीतच असते. त्याचाही पिकांना फायदा मिळतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.>आश्रमशाळांतील मुलांना सेंद्रिय भाजीपालाममताबाई १0 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ‘बायफ’ या संस्थेकडून त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. गांडूळ खताच्या छोट्या गोळ्या त्या तयार करतात. चिखलात भाताच्या रोपांमध्ये या गोळ्या पेरतात. त्यामुळे पिकांना चांगले खत मिळून उत्पादन वाढते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. अकोले तालुक्यातील शेणित, मुतखेल, मान्हेरे या आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना त्यांनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले. त्यामुळे या शाळा आपला भाजीपाला या खतांवरच तयार करतात. सर्वच आश्रमशाळांनी याची अंमलबजावणी केली तर मुलांना सकस अन्न मिळेल, असे ममताबार्इंचे म्हणणे आहे.