संगमनेर : मोदी सरकार राज्यघटना मोडून हुकूमशाही राबवू पहात आहे. पंतप्रधान देशाच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. भांडवलदारांना सूट व गरिबांची लूट करणाºया भाजप सरकारने आॅनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांनी चेष्टा केली. अन्नदात्या शेतक-यांच्या विश्वासघात केला, अशी टीका माजी खासदार नाना पटोले यांनी केली.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील साकूर येथे मंगळवारी संध्याकाळी आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शिवाजीराव थोरात, रणजितसिंह देशमुख, शंकर खेमनर, उत्कर्षा रुपवते, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, बाळासाहेब गायकवाड, नारायण कहार, सीताराम राऊत, मीरा शेटे, इंद्रजित खेमनर, हनुमंता खेमनर आदी उपस्थित होते.पटोले पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मी भाजपमधून बाहेर पडलो. नागपूरमध्ये विजय निश्चित असून विर्दभात ८ पैकी ७ जागांवर कॉँग्रेस आघाडी जिंकेल. मोदी सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांना फसविले. दिलेल्या अनेक आश्वासनांंपैकी एकही पूर्ण झाले नाही. त्याबदल आता एक शब्दही बोलायला ते तयार नाहीत. भाजपा सरकार हे आरएसएसच्या तालावर नाचत आहे. त्यांना धार्मिक दहशतवाद निर्माण करुन लोकशाही मोडीत काढायची आहे, असे पटोले म्हणाले.आमदार थोरात म्हणाले, देश, लोकशाही व राज्यघटना वाचविण्यासाठी देशात मोदी हटावची लाट आली आहे. पंतप्रधान विकासावर नव्हे तर जातीच्या व सैनिकांच्या नावावर मते मागत आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे. मागील खासदार १७ दिवसांत झाले ते हवेतच राहिले तर दुसरे अपक्ष यांनी पाच वर्षात चार पक्ष बदलले. पक्षबदल्यांना जनता स्वीकारत नाही.