आॅनलाइन लोकमत
पारनेर (अहमदनगर), दि. 1 - शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी ते आजपासून संपावर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण महामार्गावर शेतक-यांनी रात्रीपासून पहारा ठेवला आहे.
मुंबई, पुण्याकडे जाणा-या १०० ते १५० भाजीपाला, दूध व इतर शेतीमाल घेऊन जाणारी वाहनेदेखील अडवण्यात आली आहेत. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर व भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, अनिल देठे, सचिन सैद, किरण तराळ, अमोल रोकडे, सतीश पवार व टाकळी ढोकेश्वर गटातील शेतकरी उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील निघोजसह सर्व मोठ्या गावांमध्ये दूध, भाजीपाला विक्रीसाठी नेण्याचे शेतक-यांनी थांबवले आहे. तर भाळवणी-जामगाव रोडवर हॉटेल संग्राम समोरच्या चौकात दूध ओतून शेतक-यांनी आंदोलन केले. यावेळी दुध उत्पादक शेतकरी ह.भ.प भाऊसाहेब रोहोकले, कानिफनाथ तरटे, साहेबराव तरटे, भास्कर चेमटे, भिमराज ठुबे, नानाभाऊ चेमटे, कामगार नेते शिवाजी रोहोकले, सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक सोपानराव वाळुंज, काशिनाथ कदम, रंगनाथ राऊत, यादव रोहोकले, रामदास जाधव, प्रमोद गोडसे, रावसाहेब चेमटे, संभाजी आमले, शिवाजी पट्टेकर,धनेश लोढा, मुक्ताजी चेमटे, आबासाहेब चेमटे, अनिल लकडे, विशाल राऊत उपस्थित होते.