अहमदनगर : कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे या तरुण शेतक-याने मंगळवारी(दि.१ मे) रोजी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतक-यावर सोसायटीचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. या शेतक-याला राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभही मिळाला नव्हता. या नैराश्यतून कचरे यांनी आत्महत्या केली.राळेगण म्हसोबा येथील धनगरवाडी येथे रावसाहेब कचरे (वय-३८) राहात होते. त्यांना ५ एकर शेती होती. सोसायटी तसेच खासगी सावकाराचेही त्यांच्यावर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नुकतीच अर्धा एकर शेतीही विकली होती. मात्र या विक्रीतून सर्व कर्ज फिटले नाही. तसेच शेतीमध्ये उत्पादित केलेल्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले होते. या नैराश्यनेतून कचरे यांनी १ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 11:36 AM
कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे या तरुण शेतक-याने मंगळवारी(दि.१ मे) रोजी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतक-यावर सोसायटीचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. या शेतक-याला राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभही मिळाला नव्हता. या नैराश्यतून कचरे यांनी आत्महत्या केली.
ठळक मुद्दे१ लाख रुपयांचे कर्ज