नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट सदृश पावसाने संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील शेतकरी प्रभाकर देवराम गायकवाड यांच्या शेतात असलेल्या डाळिंबाच्या झाडांचे नुकसान होऊन डाळिंब फळावर डाग पडून खराब झाले आहेत. तर काही डाळींबांची झाडे वादळामुळे मोडून पडली आहेत.
जोरदार वादळी वारा व गारपीट सदृश पावसामुळे डाळिंब पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले असून साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपये किमितीच्या डाळिंब मालाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे प्रभाकर गायकवाड यांनी बोलताना सांगितला आहे. अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला नाही. संबंधित यंत्रणेकडून तात्काळ पंचनामा व्हावा अशी अपेक्षा शेतकरी गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली आहे.