समशेरपूर : अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.सांगवी धरणातून समशेरपूर, सावरगाव परिसरातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांची पिके निघतील अशी आशा होती. मात्र, हे पाणी अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, गुरुवारी सकाळी ९ वाजता समशेरपूर फाटा येथे शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनात परिसरातील सर्वपक्षीय नेते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
समशेरपूर येथे पाण्यासाठी शेतक-यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 PM