शिवन् रामचंद्रन
लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी हा संवाद साधला.‘सामुद्रा’ कंपनीचा विस्तार कसा आहे?सामुद्रा ही कंपनीचे मुख्यालय सिंगापूरला आहे. कोईमतुरला उत्पादन होते. कंपनीतील तज्ज्ञांना विद्युत पंप उत्पादनाचे तंत्रज्ञानाचा अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी आहे. अनेक नद्या समुद्रात मिळतात. म्हणजे एका विशाल समुहामध्ये काम करणे आणि एक मोठे ध्येय गाठणे असाच समुद्र याचा अर्थ आहे. त्याला ‘सामुद्रा’ हे नाव दक्षिण भारतातील बोलीभाषेवरून दिले आहे.आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता असलेले पंप हे आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. शेतकºयांसाठी आमचे दर किफायतशीर आहेत. पंप बसविण्याची पद्धत सोपी आहे. पंपाचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. तसेच शेतकरी असलेल्या ग्राहकाला अत्युच्च अशी सेवा पुरविणे हेच आमचे ध्येय आहे. अडीच हजार चौरस फुटाच्या जागेत अनेक कारखाने उभा करण्याची कल्पकता हे आमचे वैशिष्ट्य आहे. अनेक थ्रीडी टूल्स वापरून उत्पादनांची निर्मिती केली जाते. बाजाराच्या गतीशिलतेनुसार उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कंपनीचा भर असतो.आपल्या कामाचा मंत्र कोणता?हॅण्ड आॅन पद्ध्रतीशिवाय व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाहीत. विक्रेत्यांशी भागीदारी करण्यावर आमचा भर असतो. शेतकºयांना मोलाची साथ देणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी कर्मचाºयांना सक्षम करणे हाच आमच्या कामाचा मंत्र आहे. विक्रीनंतरची शेतकºयांना सेवा देणे हाच खरा आमच्या यशस्वीततेचा मंत्र आहे.आपले व्हिजन काय आहे?आमच्या कंपनीतील अभियांत्रिकीचे तंत्रज्ञान हे जगमान्य व्हावे. आणि शेतकरी हाच आमच्यासाठी पहिले प्राधान्य असेल. समाजाचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि कार्यरत असू.वीजपंपासाठी शेतकºयांना अखंड वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे.