आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ३ - मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन पुन्हा कालच्या बैठकीत सुकाणू समितीला दिले़ या आश्वासनानुसार सुकाणू समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला़ मात्र, त्याबाबत कोणालाही समितीने विश्वासात घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय पुणतांबा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती किसान क्रांतीचे डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती ग्रामसभेत देऊन त्यानंतर संप सुरु ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत निर्णय घेणे अपेक्षित असताना सुकाणू समितीने परस्पर मुंबईत बसून निर्णय घेतला़ हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही, असे सांगत धनवटे म्हणाले, पुणतांबा येथे शनिवारी सकाळी पुन्हा शेतकऱ्यांची बैठक झाली़ या बैठकीत हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ पुणतांबा येथे झालेल्या बैठकीत जयजीराव सुर्यवंशी, धनंजय जाधव यांचा निषेध करण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संपात फूट पाडल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचाही निषेध केला़