तिसगाव : कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत तिसगाव पशुवैद्यकीय चिकित्सा व उपचार केंद्राच्या वतीने शिरापूर (ता.पाथर्डी) येथे रविवारी पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. भित्तीपत्रके लावलेल्या प्रचार-प्रसार रथाने गावात संचलन करून सकाळी जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, युवा नेते बाबासाहेब बुधवंत, पुरुषोत्तम आठरे, सरपंच मंदाबाई बुधवंत, उपसरपंच नितीन लोमटे आदी उपस्थित होते. जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्यापासून खत व्यवस्थापन करणे आदींची माहिती डॉ. अरुण हरिश्चंद्रे यांनी शेतकऱ्यांना दिली. डॉ. राजेंद्र कांडेकर यांनी मुक्तगोठा संकल्पनेबाबत माहिती दिली. धनंजय जाधव, बाबासाहेब बुधवंत, गोविंद बुधवंत, बाळासाहेब गाडेकर, दिलीप बुधवंत, नामदेव शिंदे, भोजराज शेलार, संपत भताने, रामराव बुधवंत, भगवान लोमटे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब पातकळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. क्षीरसागर यांनी आभार मानले.
शिरापूर येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:31 AM