तरवडी : नेवासा परिसरात ऊस पिकावर ज्वारीवर येणारा तांबेरी नावाचा रोग ऊस पिकावर आला आहे. त्यामुळे ऊसाची पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसत आहेत.
एकतर शेतकरी आपल्या शेतात अनेक अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत शेतमाल पिकवत आहे. परंतू 'कोविड १९' व लाॅकडाऊनमुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यात हे अनपेक्षित आलेले तांबेरी रोगामुळे शेतकर्यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कारण साखर कारखाने सुरू होण्यास बराच अवधी आहे. तसेच वारंवार पडणार्या जोराच्या पावसामुळे ऊस पिके खाली पडून भुईसपाट झाली आहेत. वरील सर्व कारणांमुळे शेतकरी चिंतेत आहे.