श्रीगोंदा : शहरातील गट क्र. ११२०/२/५ मधील जागेवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही नगरसेवक गणेश भोस व इतरांनी बेकायदा टपरी टाकून अतिक्रमण केले आहे, असे म्हणत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासासाठी दिलीप मेहता व दिलीप मेथा यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
वरील गटातील ८० आर. जागा आम्ही घेतली. ही जागा बिगरशेती केली आहे. काही भागात पक्के बांधकाम केले. लगतची जागा बाबासाहेब भोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी खरेदी केली. त्या जागेवरून वाद झाला. त्यावर आमच्या याचिकेनुसार भोस व त्यांच्या सहकाऱ्यांना कंपाऊंड पाडू नये, असा मनाई हुकूम न्यायालयाने केला. मात्र, भोस यांनी आमच्या मोकळ्या जागेत टपरी टाकून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
----
दिलीप मेहता व दिलीप मेथा यांनी आमच्या १४ गुंठे जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले. त्यावर न्यायालयाचा मनाई हुकूम असताना मेहतांनी आमच्या जागेत पत्र्याचे शेड टाकले. शिवाय आमची सोशल मीडियावर बदनामी केली. यावर दिलीप मेहता व दिलीप मेथा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.
-बाबासाहेब भोस, ज्येष्ठ नेते, श्रीगोंदा