शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

पिण्याच्या पाण्यासाठी दहा गावाचे सरपंच व ग्रामस्थांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 4:08 PM

जामखेड - जवळा जिल्हा परिषद गटातील दहा गावात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे महिनाभरापासून पाणीपुरवठा योजना कोरडय़ा ठाक पडल्या आहेत. प्रशासनाला याबाबत महिनाभरापासून टँकरची मागणी केली आहे. तसेच वरीष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पाणी उपलब्ध नसल्याचे दाखले दिले तरी कर्जत उपविभागीय अधिकारी यांनी टँकरचे प्रस्ताव फेटाळले यामुळे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दहा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. 

जामखेड - जवळा जिल्हा परिषद गटातील दहा गावात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे महिनाभरापासून पाणीपुरवठा योजना कोरडय़ा ठाक पडल्या आहेत. प्रशासनाला याबाबत महिनाभरापासून टँकरची मागणी केली आहे. तसेच वरीष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पाणी उपलब्ध नसल्याचे दाखले दिले तरी कर्जत उपविभागीय अधिकारी यांनी टँकरचे प्रस्ताव फेटाळले यामुळे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दहा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.        पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे म्हणाले, जवळा गटातील दहा गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी टंचाई शाखेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील पिंपरखेड, हळगाव, अरणगाव, फक्राबाद, डोणगाव, धानोरा, बावी व चोंडी गावात मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात अवघा १८२ मि. मि. पाऊस पडला आहे. याची शासन दप्तरी नोंद आहे. कमी पाऊस असल्यामुळे या परिसरातील फळबागाला टँकरने पाणीपुरवठा शेतकरी करित आहे. चोंडी बंधारा कोरडेठाक पाडल्यामुळे या बंधाऱ्यावरून  पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना कोरडय़ा ठाक पडल्या आहेत. याबाबत प्रांत कार्यालयाला प्रस्ताव पाठवून ही त्याची दखल न घेता अजून टंचाई जाहीर झाली नाही असे प्रांतकडून उत्तर दिले जात असल्याचे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी सांगितले. तसेच कुकडीचे चालू आवर्तनात चोंडी बंधा-यात पाणी सोडल्यास सात गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो असे सरपंच ढवळे म्हणाले.      माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, उपसरपंच शहाजी म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य राजू ओमासे, फैयाज शेख, बाबासाहेब ढवळे, बापू शिंदे, संतोष कारंडे, राहुल चोरगे, बाळू कारंडे, भागवत ओमासे, शहाजी आधुरे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, धानोरा सरपंच बाळासाहेब तुपेरे, फक्राबाद सरपंच विश्वनाथ राऊत, डिगांबर जगताप, नानासाहेब आढाव, हळगाव सुरेश ढवळे, आबासाहेब ढवळे, गणपत ढवळे, ग्रामस्थ, डोणगाव सरपंच सचिन डोंगरे, कवडगाव, बावी, खांडवी, डिसलेवाडी, चोंडीचे सरपंच पांडुरंग उबाळे, सारोळा सरपंच अजय काशीद, या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.