नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव येथे होणारा कार्यक्रम मंत्री गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संपूर्ण ८ किमी ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे कारपेट सिलकोटसह डांबरीकरण होणार आहे. प्रत्येक ओढ्यावर छोटे पूल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहण्याची समस्या कायमची दूर होईल व उर्वरित मोऱ्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्ता सिलकोटसह पूर्ण होणार आहे. रस्त्यावर आवश्यकतेनुसार माहिती फलक, वळणाचे फलक, डेलीनेटर बसवले जाणार आहेत. तसेच लेन दुभाजक पट्टेही मारले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता रुंद झाल्यामुळे भाविकांना, स्थानिक नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावर प्रवास करत असतात. त्यांनाही यामुळे सुलभता प्राप्त होईल. घोडेगाव, सोनई, पानसवाडी, शनी शिंगणापूर परिसरातील दळणवळणाच्या सुविधा गतिमान होणार असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.
सोनई-घोडेगाव रस्त्याचे भाग्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:22 AM