अहमदनगर : मुलाला शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या पित्यासह मुलाला भरधाव वेगातील टँकरने चिरडले. या दोघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला. सतिष कसबे व सौरव सतिष कसबे असे ठार झालेल्या पिता- पुत्राचे नाव आहे.सतिष विठ्ठल कसबे दुचाकीवरून नववीत शिकणा-या सौरवला शाळेत सोडवण्या ााठी चालले होते. सुपा-आपधूप रोडवरील सबस्टेशनच्या जवळ पाणी भरण्यासाठी येत असलेल्या टँकरने पिता पुत्रांना चिरडले. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.