शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

खत निर्मिती प्रकल्प प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत!

By admin | Published: August 08, 2014 11:39 PM

खत निर्मिती प्रकल्प प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत!

अहमदनगर: खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका सक्षम नसल्याचे सांगत या प्रकल्प निर्मितीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करावी. त्यासाठी महापालिकेने चार आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे साडेचार कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने शुक्रवारी दिला आहे. लवादाच्या या निर्णयाने स्थायी समितीला चांगलीच चपराक बसली आहे. बुरूडगाव रस्त्यावर महापालिकेचा कचरा डेपो आहे. जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने पर्यावरण बिघडले असून परिसरातील शेतजमीन नापीक झाल्याची तक्रार भाऊसाहेब कुलट या शेतकऱ्याने हरित लवादाकडे केली होती. त्याची सुनावणी शुक्रवारी झाली. महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले. महापालिका काहीच करत नाही, फक्त वेळ मारून नेत आहे. किती दिवस मुदतवाढ देणार असा सवाल करत महापालिका हा प्रकल्प उभारणीसाठी सक्षम नसल्याचे मत लवादाने नोंदविले. मनपा सक्षम नसल्यामुळे आता प्रकल्प उभारणी प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपये महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे चार आठवड्यात जमा करावेत. जिल्हाधिकारी निविदा व इतर प्रक्रिया करून प्रकल्प उभारतील असे आदेश लवादाने दिले. तसेच यापूर्वी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केलेली पाच लाख रुपये अनामत रक्कम संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही लवादाने दिला आहे. ९ सप्टेंबर रोजी त्यावर पुढची सुनावणी होत असून त्यावेळी महापालिकेने केलेल्या कार्यवाहीचे प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश लवादाने दिले. (प्रतिनिधी)खत निर्मिती प्रकल्प तीन महिन्यात उभारा असे आदेश लवादाने ३० मे रोजी दिले होते. त्यानंतर २ जून ला स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. वाटाघाटीसाठी संबंधित ठेकेदाराला बोलवा अशी भूमिका घेत स्थायी समितीने हा विषय पुन्हा पुढच्या सभेत लोटला. दुसऱ्या सभेतही ठेकेदाराच्या प्रकल्पाची पहाणी करून मगच निर्णय घेण्याचा ठराव समितीने केला. त्यामुळे दुसऱ्या सभेतही निविदा मंजूर होऊ शकली नाही. तिसऱ्या सभेत स्थायी समितीने संबंधित ठेकेदाराची निविदा फेटाळत नव्याने निविदा मागविल्या. समितीला ठेकेदाराची निविदा फेटाळायचीच होती तर मग पहिल्याच सभेत का फेटाळली नाही. त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी का घालविला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थायी समितीच्या या वेळकाढूपणामुळेच लवादाने महापालिकेला फटकारले.