अहमदनगर : कर थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेने शास्ती माफीला आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली असून, पुढील १६ ते ३१ डिसेंबर या काळात कर भरणाऱ्यांना ५० टक्के शास्ती माफी मिळणार आहे.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ७५ टक्के शास्ती जाहीर केली आहे. ही सवलत सुरुवातीला दि. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत होती. शास्ती माफीला थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळाला असून, महापालिकेच्या तिजोरीत ४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त मायकलवार यांनी १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या काळात कर भरणाऱ्यांना ५० टक्के शास्ती माफी मिळेल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शास्ती माफी जाहीर केली आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना ७५, तर त्यानंतर ५० टक्के शास्ती माफी दिली जाईल. या काळात महापालिकेचे चारही प्रभाग कार्यालये सकाळी ९.३० ते ६ वाजेपर्यंत सुरू राहतील, तसेच शासकीय सुटीच्या दिवशी प्रभाग कार्यालये दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.