पारनेर : मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणावर असणारी गर्दी आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी रविवारी कारवाई केली. दोन मंगल कार्यालय मालकांना पत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आला.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी दुपारी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर शहरातील मनकर्निका मंगल कार्यालय व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जाऊन पाहणी केली. तेथे गर्दी दिसल्याने प्रत्येकी २५ हजार रूपये दंड करण्यात आला. बसस्थानक परिसरात दोन्ही अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
----
मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास ते सील केले जातील. पारनेर तालुक्यात शासकीय नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहोत. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंड वसूल केला जाणार आहे.
-ज्योती देवरे,
तहसीलदार, पारनेर
----
२१ पारनेर१
पारनेर बसस्थानकाजवळ तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.