श्रीगोंदा -कोरोना संचारबंदी काळात विनापरवाना मुख्यालय सोडून स्वत:च्या खाजगी कामाकरिता जिल्हा बंदीचे उल्लंघन करून पुण्याची सफर वेळोवेळी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कविता नावंदे ह्या गुरुवारी सकाळी आठ वाजता अलिशान कारमधून नगरकडे जात होत्या. पुणे -नगर महामार्गावर गव्हाणेवाडी चेक पोस्टवर त्यांची गाडी श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी अडविली आणि कविता नावंदे पोलिसाच्या जाळ्यात अडकल्या.
कविता नावंदे या पुण्याला राहत असून त्यांनी संचारबंदी काळात पुणे-नगर असा असा प्रवास केला, ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना समजली. त्यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांना गव्हाणेवाडी चेक पोस्टवर नाकेबंदी करण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यानुसार महेंद्र माळी यांनी कारवाईची जबाबदारी नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्यावर सोपविली. गुरुवारी पुण्यावरून नगर ला येत असताना कविता नावंदे सापडल्या. कविता नावंदे यांना बेलवंडी पोलिस स्टेशनला आणण्यात आले आणि जिल्हाबंदीचे उल्लंघन करून जिल्ह्यात गुपचुप प्रवेश करताना पकडले गेल्यानंतर आंतर जिल्हा तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचाºयांना अधिकृत परवानगी नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयायाला पाठवून त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.