कोपरगाव : कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या बियाणे कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव, संवत्सर,ओगदी व इतर गावातील शेतकºयांना के. एस. एल. ४४१ या सोयाबीनच्या निकृष्ट वाणाची जून महिन्यात विक्री केली होती.
शेतकºयांनी या बियाणाची पेरणी केल्यानतर १० ते २० टक्केच उगवण झाल्याने शेतकºयांची फसवणूक झाली हे लक्षात आले होते. त्यानंतर या प्रकरणी कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव यांनी कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे.