चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील कोरोनाचे लसीकरण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रापुरते मर्यादित न राहता गावोगावी लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी तहसीलदारांकडे केली केली होती. ही मागणी मान्य करत प्रशासनाच्या वतीने नगर तालुक्यात गावोगावी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
याबाबत कोकाटे म्हणाले, कोरोनाचे लसीकरण फक्त ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असताना तालुक्यातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ५०-१०० लस उपलब्ध असताना लस घेण्यासाठी ३००-४०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतात आणि लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना रोज चकरा माराव्या लागत होत्या.