अहमदनगर : महापालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असून, कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्मचाऱ्यांना सीटी स्कॅन करण्यासाठी मराठा सेवा महासंघाच्या वतीने अर्थिक मदत केली जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा मिळत नाही. महापालिका कर्मचारी बाधित होत आहेत. गंभीर रुग्णांना सीटी स्कॅन करण्यास सांगितले जाते. ही तपासणी करण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना करणे शक्य होत नाही. अशा कर्मचाऱ्यांसाठी सेवाभावी वृत्तीने सीटी स्कॅनच्या शुल्कात सवलत दिली जाईल. त्यासाठी संबंधित डॉक्टरांशी स्वत: चर्चा करणार असून, कर्मचाऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन इथापे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.