तिसगाव : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह पांढरीचा पूल, नेवासा, शेवगाव या महामार्गावरील रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या २३ हजार ४८७ वाहनांवर धडक कारवाई करीत त्यांच्याकडून १ कोटी १९ लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड महामार्गावरील वाहतूक पोलीस पथकाकडून वसूल करण्यात आला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह शेवगाव, पांढरीचा पूल, नेवासा या महामार्गावर महामार्ग पोलीस पथकाकडून महामार्गावर प्रवास करताना महामार्गाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या २३ हजार ४८७ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ कोटी १९ लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पुणे महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक प्रीतम यावलकर, अहमदनगर महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
पोलीस पथकाकडून सव्वा कोटीचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:15 AM