अहमदनगर : महापालिकेने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचे पालन न करता चोरून विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत दक्षता पथकाने दोन दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल केला आहे. बुधवारी कापडबाजारातील एका दुकानदराला १७ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र, दुकाने बंद करून कापड, किरणा मालाची विक्री सुरू असल्याने दुकानांत गर्दी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या दक्षता पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. दक्षता पथकाने मंगळवारी गंज बाजार, माळीवाडा, ख्रिस्त गल्ली, ग्राहक भांडार जवळ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. तसचे दक्षता पथक क्रमांक एक यांच्याकडून सावेडी येथील दुकाने उघडल्याने दोन दुकानदारांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड केला. कारवाई केलेल्या पथकात सहायक राहुल साबळे, राजेश आनंद व पोलीस कर्मचारी संतोष राठोड आणि सोपान शिंदे उपस्थित होते. याशिवाय कापड बाजार दुकानदाराला १७ हजार, तर फळ विक्रेत्याला एक हजाराचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक आयुक्त दिनेश सिनारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाले केली. कारवाई केलेल्या पथकात सहायक सूर्यभान देवघडे, भास्कर आकुबत्तीन, विजय नवले, राजू गोरे, शैलेश दुबे, यू. आर. क्षीरसागर, पी. बी. आंबेकर, रमेश चौधरी, एस. डी. जाधव, एस. एस. गायकवाड, आर. एस. साळवे आदींचा समावेश होता.
...
फोटो मेलवर पाठविला आहे.