अहमदनगर: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.
आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी येणार नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पोपटराव पवार यांनी सूत्रे हलवलीहिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरणा टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले.त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नातेवाईकांनी फोडला हंबरडादरम्यान गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला सुरुवात केली दरम्यान घटनास्थळी तातडीने आमदार संग्राम जगताप हे दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली.