पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नव्हता. परंतू शुक्रवारी पळवे बुद्रुक येथे एक ५५ वर्षीय महिला कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे.
पळवे परिसरातील गावे आतापर्यंत सुरक्षीत होती. गेली सहा महिने ग्रामपंचायत तसेच नागरीकांनी योग्य काळजी घेतल्याने तसेच वेळोवेळी गावांत औषध फवारणी केल्याने गावात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. साधी लक्षणे दिसली तरी येथील लोक लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधतात व त्यावर लगेच उपचार दिले जातात. म्हणूनच सर्व नागरिकांचे आरोग्य सुरक्षीत राहिल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सारिका निर्मळ यांनी सांगितले.
परंतु आता एका महिलेचा शहरातील नातेवाईकांशी संपर्क आल्याने तिला कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यासोबत घरातील आठ जनांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे तसेच घराचा परिसर कंटेन्टमेंट झोन केल्याचे ग्रामसेवक गणेश घुले यांनी सांगितले. यापुढे परिसरातील व्यक्तींनी वृद्ध व लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. सारीका निर्मळ यांनी केले आहे.