यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेविका सुनीता कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश दळवी उपस्थित होते.
यावेळी पहिली लस दिलेल्या शेळके यांचा सत्कार करण्यात आला. केडगाव आरोग्य केंद्रात प्रवेशद्वारावर कोरोनावर मात करण्यात ही लस यशस्वी असल्याचा संदेश देणारी सुबक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी केंद्रातील आशासेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी, तसेच खासगी डॉक्टर यांना लस देण्यात आली. केडगाव केंद्रात यापुढे हे लसीकरण करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. स्वागत कक्षात सर्वात प्रथम ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार असून, त्यानंतर लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यानतंर निरीक्षण कक्षात अर्धा तास ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे व्हँटिलेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. केडगाव केंद्रात एक तासाच्या अंतराने प्रत्येकी दहा जणांना लस देण्यात आली. दिवसभरात शंभर जणांना ही लस देण्यात आली.
.....
केडगाव केंद्रात कोरोनावर मात करण्यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक मोहीम सुरू होती. आता लसीकरण सुरू झाल्याने सर्वांचा उत्साह वाढला आहे. सर्वांनी यास उत्तम प्रतिसाद दिला, इतर नागरिकांकडून आता आम्हाला लस कधी मिळणार, याची विचारणा होत आहे. आजची लसीकरणाची मोहीम आम्ही सोहळ्याप्रमाणे साजरी केली.
- डॉ.गिरीश दळवी, आरोग्य अधिकारी, केडगाव
....
फोटो-१६केडगाव लस
१६केडगाव लस रांगोळी
...
ओळी-१) केडगाव आरोग्य केंद्रात पहिली कोरोना लस आरोग्य केंद्रातील आशासेविका सीता शेळके यांना देण्यात आली. यानंतर, शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
२) केडगाव येथे लसीकरणाचा हा पहिला दिवस सोहळा म्हणूनच साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.