श्रीगोंदा : तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस सोमवारी नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुलगा व सुनेच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सदर महिला पतीसोबत ठाणे येथे राहत होती. तिच्या पतीचे कोरोनाने ८ मे रोजी निधन झाले. या महिलेची ठाण्यात महापालिका प्रशासनाने तपासणी केली होती. पण वैद्यकीय अहवाल येण्याअगोदरच ती चिखली येथे माहेरी आली होती. ती माहेरी मळ्यात मुलगा व सुनेबरोबर राहिली. या महिलेच्या ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या तीन चाचण्या घेतल्या होत्या. महिलेची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे ठाणे महापालिकेने तिचा अहवाल पाठविला आहे. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेला नगरला क्वारंटाईन कण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुलगा व सुनेच्या तिनही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. चिखलीतील या तीन व्यक्तीच्या संपर्कात चिखलीतील कोणीच आलेले नाही ही समाधानाची बाब आहे. पण तहसीलदार महेंद्र महाजन व आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी याबाबत आढावा घेतला असून कोरोनाबाधित महिलेच्या घराच्या परिसरात गावात औषध फवारणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे चिखलीत दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला; महिलेसह तिघांना नगरला केले क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:35 AM