योगेश गुंडकेडगाव : सर्वांचीच उत्कंठा लागलेल्या महापालिका निवडणुकीत केडगाव उपनगरात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. येथील सेनेचे सेनापती दिलीप सातपुते यांच्या पराभवाने मात्र ‘गड आला पण सिंह गेला’ अशी काहीशी शिवसेनेची अवस्था झाली तर भाजपच्या मनोज कोतकर यांनी सातपुते यांना शह देत विजय खेचून आणला़ काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे केडगाव या निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाले.केडगावमधील सर्व कोतकर समर्थक उमेदवारांनी काँग्रेस सोडून भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यात काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवल्याने सेनेने मोठा जोर लावला. या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे केडगावच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथील प्रभाग १६ व १७ या दोन प्रभागात सेना आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई झाली. प्रभाग १६ मधून सेनेचे अमोल येवले, विजय पठारे, सुनीता कोतकर व शांताबाई शिंदे या चारही उमेदवारांनी विजय मिळविला़ याच प्रभागात काँग्रेसने ऐनवेळी मैदानात उतरविलेल्या उमेदवारांनी हजार मतांचा टप्पा ओलांडल्याने भाजपच्या कोतकर समर्थक उमेदवारांची पिछाडी सुरु झाली. काँग्रेसची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरल्याने या प्रभागात सेनेच्या चारही जागा मोठ्या फरकाने निवडून आल्या.प्रभाग १७ मधून दिलीप सातपुते व मनोज कोतकर यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र कोतकर यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. कोतकर यांच्या सोबत लता शेळके, गौरी ननावरे, राहुल कांबळे या भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. सेनेच्या मोहिनी संजय लोंढे आणि काँग्रेस पुरस्कृत शिवाजी लोंढे यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला.केडगावमधून सुनील कोतकर, सुनीता कांबळे, मोहिनी संजय लोंढे, दिलीप सातपुते या विद्यमान नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला.सातपुते यांचा पराभव केडगाव सेनेच्या जिव्हारीकेडगावमधील सेनेच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेणारे दिलीप सातपुते यांना मात्र यावेळी मतदारांनी नाकारले. त्यांनी घडवलेले सेनेचे कार्यकर्ते नगरसेवक झाले आणि ते स्वत: केडगावमधून पराभूत झाले. त्यांचा पराभव सेनेच्या केडगावमधील नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दु:खदायक ठरला.कोतकरांचा भाजप फॅक्टर फ्लॉपएका रात्रीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केडगावमध्ये कमळ फुलविणे कोतकर यांना या निवडणुकीत चांगलेच महागात पडले. प्रभाग १६ मध्ये तर मतदारांना हे चित्रच आवडले नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. काँग्रेसने आव्हान उभे केल्याने प्रभाग १६ मध्ये भाजपला मोठा फटका बसला. त्यात प्रभाग १७ मध्ये सर्वपक्षीय कोतकर एकत्र आल्याने मतदारांनी त्यांच्या एकीला स्वीकारत भाजपला कौल दिला.विजय पाहण्यासाठी माझे पती हवे होतेकेडगाव हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेले संजय कोतकर यांच्या पत्नी सुनीता कोतकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. माझ्या पतीने व मी केडगावमध्ये अनेकवेळा निवडणुका लढविल्या पण सेनेला यश मिळत नव्हते. आज केडगावमधील लोकांनी मला विजयी केले पण हा विजय पाहण्यासाठी माझे पती नाहीत,अशी खंत कोतकर यांनी व्यक्त केली.
केडगाव वेशीवर प्रथमच फडकला भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:54 AM