शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

आधी काम... नंतर निविदा, वखार महामंडळाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 8:39 PM

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा जिल्ह्यातील गोदामांची दुरुस्ती, रंगरंगोटीनागापूर गोदामाच्या रंगरंगोटीेचे काम पूर्ण मार्चएण्डमुळे निधी संपविण्याची घाई

सुदाम देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची राज्यात आठ विभागीय कार्यालये, तर १८७ ठिकाणी ८०० गोदामे आहेत. कृषी उत्पादने, बियाणे,खते, शेती अवजारे, कापूस,औद्योगिक मालाची साठवणूक आणि तेथून वितरण करण्यासाठी गोदामे बांधण्यात आली आहेत. गोदामामध्ये शेतक-यांच्या उत्पादनासाठी जागाही राखून ठेवली जाते. यामुळे मालाची प्रत टिकून राहते. आग, पूर, चोरी अशा धोक्यांपासून संरक्षणासाठी १०० टक्के विमा उतरविला जातो. गोदामाची डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याचे कामही दरवर्षीच सुरू असते. उन्हाळा सुरू झाल्याने सध्या गोदामांची दुरुस्ती, नुतनीकरण,रंगरंगोटी,संरक्षक भिंत बांधणे, विद्युत दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.जिल्ह्यातील गोदामांची दुरुस्ती, रंगरंगोटीराज्य वखार महामंडळाची जिल्ह्यात दहा ठिकाणी गोदामे आहेत. वाकोडी रोड, भवानीनगर (नगर), केडगाव, नगर-पुणे रोड (नगर), खडकी, दौंड रोड, कायनेटिक चौक (नगर), नागापूर एमआयडीसी (नगर), मार्केट यार्ड, कोपरगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, नेवासा, शिंगवे तुकाई-घोडेगाव, नेवासा एमआयडीसी, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, संगमनेर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्रीरामपूर, वांबोरी (ता. राहुरी). अशी गोदामे आहेत. यापैकी नेवासा एमआयडीसी, संगमनेर, केडगाव, नागापूर येथील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे सुरू आहेत.नागापूर गोदामाच्या रंगरंगोटीेचे काम पूर्ण‘लोकमत’ने नागापूर एमआयडीसी येथील गोदमाची रविवारी (दि.२५) दुपारी पाहणी केली असता येथील गोदामाच्या रंगरंगोटीची बहुतांश कामे पूर्ण झाली होती. या गोदामाच्या रंगरंगोटीचे २१ लाख ५७ हजार ९८ रुपये खर्चाचे आहे. या कामाची निविदा ३ मार्च रोजी उघडणार आहे. मात्र निविदा उघडण्याआधीच हे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र