कर्जत-जामखेडला जिल्हा परिषदेमार्फत तीन तर राज्य शासनामार्फत दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. आ.पवार हे पुणे जिल्हा परिषदेत सदस्य असताना, त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत रुग्णवाहिका देण्याची संकल्पना राबविली होती. हाच उपक्रम नगर जिल्हा परिषदेमार्फतही त्यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर याच्या सहकार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी ४० रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार पवार यांच्यासह प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, वैद्यकीय अधिक्षक कुंडलिक अवसरे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, अशोकराव खेडकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हत्रे, डॉ.शबनम इनामदार, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सचिन सोनमाळी, सचिन कुलथे, अभय बोरा आदी उपस्थित होते.
ओळी- कर्जत-जामखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले.