कोपरगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भातील घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने शनिवारी (दि. २७) कोपरगाव शहरातील दोन हॉटेल, इलेक्ट्रिक, कपडे, सराफा पेढी अशा पाच आस्थापना ७ दिवसांसाठी सील केल्याची धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यासह कोपरगाव शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णवाढ सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियम न पाळणाऱ्या आस्थापनावर ७ दिवसांसाठी बंद ठेवण्यासाठीच्या कारवाईचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार शनिवारी तहसीलदार योगेश चंद्रे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव देसले, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी संभाजी कार्ले, मार्केट विभागप्रमुख योगेश्वर खैरे, स्वच्छता निरीक्षक सुनील आरण, अरुण फाजगे, रणधीर तांबे यांच्यासह पोलीस, कर्मचारी यांच्या पथकाने दुपारी १ वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील बाजारपेठेत गस्त घालून दुकानांची तपासणी केली. या दरम्यान ज्या आस्थापना चालकांनी कोरोना संदर्भातील जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उलंघन केले, अशा आस्थापनांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे.
.......