शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना पाचशे रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:19 AM

खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयला आठ-नऊ तासांची ड्युटी करावी लागते. दिवसाला फक्त ५०० रुपये पगार मिळत असला तरी नोकरीची शाश्वती ...

खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयला आठ-नऊ तासांची ड्युटी करावी लागते. दिवसाला फक्त ५०० रुपये पगार मिळत असला तरी नोकरीची शाश्वती केवळ सहा महिन्यांची आहे. त्यामुळे जिवावर उदार होऊन काम करण्याऱ्यासाठी नोकरीची कोणतीही शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे.

दररोज कोरोना रुग्णांशी संपर्क आणि काम करताना सतत स्वतःची आणि कुटुंबाची वाटणारी चिंता अशा परिस्थितीत वॉर्डबॉय कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळतात. जोखमीचे काम करतात. अनेक जण हे काम करताना आजारीही पडले आहेत. मात्र, तब्येतीची काळजी करत बसण्याची मुभा त्यांना परिस्थितीने दिलेली नाही. मानधनावर, कंत्राटी काम करीत असल्याने त्यांना कोणतेही विमा कवच उपलब्ध नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात तीन-तीन महिन्यांच्या करारावर काही ठिकाणी सहा महिन्यांच्या करारावर वाॅर्डबॉयची भरती करण्यात आली आहे. वॉर्डबॉय यांना महिन्याचा पगार केवळ १२ ते १५ हजार इतका दिला जातो आहे. कोरोनाचे संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि नोकऱ्या, घरातील बिकट आर्थिक स्थिती, दोन वेळच्या खाण्याची चिंता अशा अनेक अडचणींमुळे अनेक तरुण मुलांनी नोकरी पत्करली आहे. मानसिक आणि शारीरिक ताण सहन करतच ते नोकरीचा गाडा हाकत आहेत. रुग्णालयांनी किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी नोकरीवर रुजू करून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. एखादा दिवस सुटी घेतली तर पगार कापला जाऊ नये, असेही त्यांचे म्हणणे आहे.

------

नगर येथील एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे - ५०

दिवसाला रोजगार - ५०० रुपये

कंत्राट - सहा महिन्यांचे

-------

२२ वर्षांचा संतोष

नगरच्या एका रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी करण्यासाठी येतो. घरी आई, वडील, दोन बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. नगर तालुक्यातील एका गावात त्याचे कुटुंब राहते. मागच्या वर्षीपर्यंत एका खासगी ऑफिसमध्ये ऑफिसबॉयचे काम करत होता. कोरोनामुळे नोकरी गेली, रोजगार गेला. मित्राच्या ओळखीतून तो खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून नोकरीला लागला. कोरोना रुग्णांची सेवा तो करतो. रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह पॅक करायचा अशी कामे तो करतो. तुटपुंज्या पगारात घरचा खर्च भागत नाही. मात्र, सध्या कोणत्याच प्रकारचे काम मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

-----

आमची दररोजची ड्युटी आठ ते दहा तासांची असते. गतवर्षी एका रुग्णालयात ३० हजार महिन्याला पगार दिला होता. यंदा १५ हजारांवर काम करतो आहे. त्यातही ठेकेदार काही पैसे कापतो.

- राजू, एक तरुण

------

सहा महिन्यांनी नवीन कंत्राटावर घेतील की नाही, याची कल्पना नाही. जिल्ह्याच्या विविध भागांतून तरुण वॉर्डबॉय म्हणून येतात. बरेचदा जाण्या-येण्याचा, जेवणाचा खर्चही पगारातून भागत नाही.

- कैलास, एक तरुण

-----

वॉर्डबॉयच्या मागण्या काय आहेत?

अ. कॉन्ट्रॅक्ट तीन महिन्यांऐवजी एक वर्षाचे करावे

ब. वॉर्डबॉयचा विमा उतरवावा

क. पीएफ कापण्याऐवजी पूर्ण पगार हातात द्यावा.

----

काय असते काम ?

वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणांना कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वच कामे करावी लागतात. रुग्णांची स्वच्छततेपासून सर्व सेवा ते एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाचे पॅकिंग करून ते रुग्णवाहिकेचे पर्यंत नेण्याचे काम त्यांना करावे लागते. त्यामुळे आठ ते दहा तास ड्युटी करावी लागते.

--------

सूचना

डमी आहे....