भेंडा : श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीने पाच लाख सभासदांचा टप्पा पूर्ण केला असून, ५१ लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी दिली.
पतसंस्थेने पाच लाख सभासदांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भेंडा शाखेत सभासदांना पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, अशोक मिसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, शिवाजी तागड, उपसरपंच दादा गजरे, गणपतराव गव्हाणे, अजित रसाळ, गणेश महाराज चौधरी, सुनील गव्हाणे, सुभाष चौधरी, पत्रकार बाळकृष्ण पुरोहित, कारभारी गरड, देवेंद्र काळे, लक्ष्मणराव नवले, विनायक मिसाळ, साईनाथ गोंडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या समन्वयक मीनाक्षी पंडित यांनी प्रास्ताविकातून नागेबाबा विमा सुरक्षा कवच, नागेबाबा अन्नपूर्णा योजना, नागेबाबा वृक्षलागवड योजना, सवलतीच्या दरात पुस्तक योजना आदी उपक्रमाची माहिती दिली. दत्तात्रय काळे, अशोक मिसाळ, अजित रसाळ, कारभारी गरड यांनी मनोगत व्यक्त केली. संस्थेच्या बचतगट अधिकारी अनिता दहातोंडे, नागेबाबा पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर गोर्डे, संतोष साप्ते, लक्ष्मण थोरात, दिलदार शेख, रवींद्र व्यवहारे, मोहन वाघडकर, सागर इटकर, पूजा भालसिंग, कामिनी बोरुडे, ज्योती रोडगे, सिरोजउद्दीन सय्यद, महादेव आढाव यांच्यासह सभासद-खातेदार उपस्थित होते. राजेंद्र चिंधे यांनी आभार मानले. (वा. प्र.)