२८ ऑगस्ट १९४९ रोजी भारताच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ७ डिसेंबरला सशस्त्र ध्वज दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. युद्धात शहीद व जखमी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी नागरिकांमध्ये लहान झेंड्याचे वितरण करून त्या बदल्यात सैनिकांसाठी निधी जमा करण्याचा मूळ हेतू या दिवसाचा आहे.
भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रत्येक छात्रसैनिकाने देशासाठी बलिदान दिलेल्या जवान व अधिकाऱ्यांचे स्मरण ठेवावे, असे मत मेजर संजय चौधरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. किसन सूळ यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली यांनी छात्रसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
------------
फोटो मेल एनसीसी ध्वज दिन
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वज दिन साजरा करण्यात आला.