राहुरी : भरधाव वेगाने जाणा-या वाळूच्या वाहनाने ३० मेंढ्याचा बळी घेतला तर १० मेंढ्या जखमी झाल्या.मेंढ्या चिरडल्या जात असतांना वाहनाने अहमदनगरच्या दिशेने पलायन केले़ मेंढपाळाचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ या वाहनाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर काल बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात हा अपघात झाला़ मयत झालेल्या मेंढ्या पोपटराव हांडे यांच्या मालकीच्या आहेत़ मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरून मेंढ्या नगर-मनमाड रस्ता ओलाडंत होेत्या़ त्याचवेळी राहुरीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने वाळूचा डंपर जात असलेल्या एका डंपरने तब्बल ४० मेढ्या चिरडल्या. यामध्ये ३० मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला तर १० जखमी झाल्या. मेंढ्या चिरडल्यानंतर न थांबता अंधाराचा फायदा घेत डंपरचालकाने पलायन केले़घटनेची माहीती कळताच पोलिस निरीक्षक आविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ डेहेरे येथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन डंपरचे फुटेज आढळून आले आहे़ मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनेची माहीती कळताच विजय तमनर, अण्णा बाचकर, शरद बाचकर मदत केली.मेढ्यांनी केले होते आंदोलनराहुरी तहसील कचेरीसमोर धनगर समाजाने आरक्षण संदर्भात आंदोलन छेडले होते़ त्यावेळी १३० मेंढ्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ पारनेर तालुक्यातील पोपट हांडे हे पारनेरकडे दुस-या दिवशी मेंढ्यासह रवाना होणार होते. मात्र डंपरने चिरडल्याने आर्थिक व मानसिक हानी झाली़अपघातात दोन कुत्रेही दगावले आहेत.