श्रीगोंदा : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीने थैमान घातले आहे. त्यामुळे हजारो कुटुंब उघड्यावर आहेत. अशा या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नागवडे कुटुंब पूरग्रस्तांना मदत करणार आहे. त्यासाठी नागवडे साखर कारखान्यावर मदत संकलन केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली.
नागवडे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातून ज्या इच्छुकांना मदत द्यायची असेल, अशा दानशूर व्यक्तींनी नागवडे कारखाना कार्यस्थळावर भाऊसाहेब बांदल व भरत लगड यांच्याशी संपर्क साधावा. स्वेच्छेने आर्थिक अथवा धान्य स्वरूपात मदत करावी, या मदतीची शिदोरी पूरग्रस्तांपर्यंत पोहोच करून मानवतेचा जागर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या वतीने करणार आहे, असेही नागवडे म्हणाल्या.