अहमदनगर : नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हे अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. श्रीपाद छिंदम हे भाजपकडून नगरचे उपमहापौर झाले होते. महापौर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते. याची राज्यभरात चर्चा झाली होती. यामुळे त्यांना उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर छिंदम पुन्हा अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी नगरमधून विधानसभेसाठी अर्ज नेला होता. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. ते आता बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:26 PM