शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

माजी मंत्री भारस्कर यांचे निधन

By admin | Published: May 02, 2016 11:11 PM

अहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : जुन्या आठवणींना उजाळाअहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी येथील अमरधाम येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते़ भारस्कर यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी टिळकरोड येथील त्यांच्या शामा चंद्रमुखी या निवासस्थानातून निघाली. अमरधाम येथील शोकसभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते, तहसीलदार सुधीर पाटील, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माधव वाघ, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, लहू कानडे, पोपट साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारस्कर यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९३० मध्ये झाला. त्यांचे शिक्षण शेवगाव व नंतर नगर आणि पुण्यात झाले. विद्यार्थीदशेतच ते १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाले. १९५२ मधे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते श्रीगोंदा-कर्जत या राखीव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. यानंतर १९५७, १९६२, १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते याच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. १९६७ मध्ये त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ भारस्कर यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग आदी संस्थांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले़ त्यांनी काही काळ जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले़ बाळासाहेब भारदे, रावसाहेब पटवर्धन या जिल्ह्यातील नेत्यांना ते आदर्श मानीत. त्यांच्या अंत्यविधीस जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक नामवंत, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. शांत, संयमी तसेच सर्वसामान्य लोकांच्या कामाबाबत सदैव तत्पर असणाऱ्या भारस्कर यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.(प्रतिनिधी)बाबुराव भारस्कर यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने समाजात लोकप्रियता मिळवली होती. विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांचे प्रतीनिधीत्व करतांना विकासाच्या मुख्य प्रवाहात या समाज घटकाला आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. समाजकल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविताना त्यांनी नाही रे वर्गाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. मातंग समाज आर्थिक उन्नती विकास महामंडळाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. कॉँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक कार्यात भारस्कर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. त्यांच्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विखे कुटुंबीय आणि त्यांचा असलेला ऋणानुबंध राजकारणापलिकडचा होता. -राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते