अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विकास सेवा सहकारी संस्थेतून जिल्ह्यातील आजी- माजी आमदारांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले. कोपरगाव वगळता सर्वच तालुक्यांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आजी-आमदारांमध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके, भाजपच्या आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे, सेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अकोल्यातून भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ, तर जामखेडमधून जगन्नाथ राळेभात यांनी अर्ज दाखल केले आहेत. राळेभात यांना माजी मंत्री राम शिंदे हे सूचक आहेत. कोपरगाव तालुक्यातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. राहाता तालुक्यातून अण्णासाहेब म्हस्के, तर राहुरी तालुक्यातून अरुण तनपूरे, सुरेश बानकर, तानाजी ढसाळ यांचे अर्ज दाखल झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून माधवराव कानवडे यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. शेवगाव तालुक्यातून एकमेव घुले यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत. श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातून भानुदास मुरकुटे, करण ससाणे, दीपक पटारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगर तालुक्यातून रोहिदास कर्डिले यांनीही अर्ज दाखल केला आहे.
...
एका दिवसात ६८ अर्ज
एकाच दिवसात तब्बल ६८ अर्ज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. यात शेतीपूरक मतदारसंघातून मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब शेळके, तानाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे, गणपत सांगळे, बिगर शेतीमधून मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रवींद्र बोरावके, शामराव निमसे, शिवाजी डौले, पांडुरंग अभंग, सुवर्णा साेनवणे, सचिन गुजर, महिला राखीवमधून आशा काकासाहेब तापकिर, जयश्री विजय औटी, सुप्रिया वसंतराव पाटील, पद्मावत संपत म्हस्के, सुवर्णा मच्छिंद्र सोनवणे, अनुसूचित जातीमधून नंदकुमार लक्ष्मण डोळस, नागरिकांचा इतर मागास प्रवर्गमधून काकासाहेब तापकिर, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, सुरेश करपे, रवींद्र बोरावके, पांडुरंग अभंग, भगवान फुलसौंदर, अनिल शिरसाठ, तानाजी धसाळ, कैलास शेवाळे, दीपक पटारे, केशव बेरड, सचिन गुजर, अरुण पानसंबळ, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधून अशिष बिडगर, अभय अव्हाड, गणपत सांगळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
....
एकूण १०६ उमेदवारी अर्ज
जिल्हा बँकेसाठी आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १०६ उमेदवारी अर्ज शुक्रवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय १३४ जणांनी १८४ अर्ज घेतले असून, अर्ज विक्रीची संख्या ४७६ इतकी आहे. आज, शनिवार व रविवारी सुटी आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
....
सूचना : शिवाजी कर्डिले