शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप अनंतात विलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:54 AM

कुंडलिकराव जगताप यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता कोईमतूर येथू पिंपळगाव पिसा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. तेथे त्यांचे कुटूंबीय व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा कुकडी कारखान्यावर आली.

अहमदनगर : श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांच्यावर कुकडी कारखाना कार्यस्थळावर सोमवारी सकाळी ११़ ४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.कुंडलिकराव जगताप यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे ते वडील होत. गेल्या काही दिवसांपासून कोईमतूर येथे जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुंडलिकराव जगताप यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य, श्रीगोदा पंचायत समितीचे माजी सदस्य व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले़ त्यांच्या अंत्यसंस्कारास खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, म्हाडाचे व्यवस्थापक तथा दिवंगत कुंडलिकराव जगताप यांचे व्याही राजेंद्र चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.कुंडलिकराव जगताप यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता कोईमतूर येथू पिंपळगाव पिसा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. तेथे त्यांचे कुटूंबीय व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा कुकडी कारखान्यावर आली. तेथे कार्यकर्त्यांनी व कामगारांनी अंत्यदर्शन घेतले़ आमदार राहुल जगताप यांनी मुखाग्नी दिला.

शरद पवार येणार

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार हे मयत कुंडलिकराव जगताप यांच्या अंत्यसंस्कारास पोहोचू शकले नाहीत. ते दुपारी तीन वाजता येणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKundalik Jagtapकुंडलिक जगताप