अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी गुरुवारी उच्चांक गाठला होता. हा आलेख शुक्रवारी खाली आला असून, दिवसभरात ८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या घटली असली, तरी दोन दिवसांत ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वर्ष उलटले आहे. पण, वर्षपूर्तीनंतर त्याचे आव्हान आणखी वेगाने वाढले आहे. जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. बुधवारपर्यंत हा आकडा स्थिर होता. परंतु, गुरुवारी अचानक १ हजार ३३८ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या नगर शहरात ४५७ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांनंतर प्रथमच जिल्ह्यातील रुग्णसंख्येने एक हजारांचा टप्पा पार केला होता. हा आलेख वाढत जाऊन कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती होती. सुदैवाने शुक्रवारी हा आकडा कमी होऊन ८२९ झाला. चालू आठवड्यात आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढून जिल्हाभरातून १००० ते १२००० स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत आले. एका दिवसात एवढे सर्व नमुने तपासून होत नाहीत. त्यामुळे अचानक रुग्णसंख्या वाढली. नगर शहरातील रुग्णसंख्याही या कारणामुळेच वाढलेली दिसली. ती शुक्रवारी निम्म्याने कमी झाली. नगर शहरात शुक्रवारी दिवसभरात २३९ इतके रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या घटली असली, तरी मागील दोन दिवसांत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने मागील सात दिवसांत ४ हजार ७६७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
........
मागील सात दिवसांतील रुग्णसंख्या
दिनांक रुग्णसंख्या
२० मार्च ८२९
२१मार्च ५५९
२२ ४७५
२३ ६११
२४ ४५६
२५ १३३८
२६ ८२९
....
कुठे किती आढळले रुग्ण
नगर शहर- २३९
काेपरगाव-८९
राहाता-८१
नगर-७४
श्रीरामपूर-५५
नेवासा-५२
पारनेर-४८
संगमनेर-३७
कर्जत-३२
रहुरी-३०
पाथर्डी-२९
अकोले-२७
श्रीगोंदा-१०
जामखेड-४
शेवगाव-२
...........