अकोले : निवडणूक काळातील कोरड्या दिवशी मंगळवारी शहरातील माळीझाप शिवारातील एका हॉटेलच्या मागे उसाच्या शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका कारमधून चार लाख ४ हजार ४० रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली.माळीझाप शिवारातील हॉटेल जय मल्हारच्या पाठीमागे उसाच्या शेतात ही कारवाई करण्यात आली.आरोपी श्रीकांत चौधरी यास जागेवर अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस.डी.परदेशी, दुय्यम निरीक्षक आर.एल.कोकरे, पी.एस. कडभाने, संगीता जाधव, विपुल कर्पे, सुनील निमसे, अनिल मेंगाळ, तौसीफ शेख यांचे पथकाने ही कारवाई केली