अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. शुक्रवारी (दि.२४) आणखी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २४ झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत वीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवारी आणखी चौघांना डिस्चार्ज देण्यात आला. या चौघांचेही १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये आलमगीर येथील दोघे, आष्टी (जि. बीड) येथील एक व सर्जेपुरा (नगर शहर) येथील एक अशा चार रुग्णांचा यांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून सध्या १२ जण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
नगर जिल्ह्यात आणखी चौघे कोरोनामुक्त; आतापर्यंत २४ जण गेले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 3:47 PM